सिंदखेडराजा हे मध्ययुगीन भारताच्या इतिहासातील शिवसंस्कृतीचे आदिपीठ आहे. राजमाता,राष्ट्रमाता जिजाऊचा जन्म
12 जानेवारी 1598 रोजी सिंदखेडराजा येथे झाला. राजमाता जिजाऊने या देशात ऐतदेशीयांच्या स्वराज्याची स्थापना
करण्यासाठी आपले सुपुत्र छत्रपती शिवरायाना घडविले आणि जगात एका इतिहासाची निर्मिती केली. स्वाभाविकच
शिवसंस्कृतीच्या या अति प्राचीन उगमस्थानाला म्हणजेच सिंदखेडराजाला एक आगळे ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झालेले
आहे.
सिंदखेड राजा येथील मातृतिर्थावर जवळपास 450 एकर जागेवर 11,000 कोटी रूपयांच्या प्रस्तावित खर्चांचे एक भव्य
स्वप्न मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष, सम्माननीय पुरूषोत्तम खेडेकर ह्यांनी पाहिले, त्या स्वप्नाचे
नाव 'जिजाऊसृष्टी' प्रकल्प होय.
राजमाता, राष्ट्रमाता जिजाऊंच्या जन्माचे वेळी ४५,००० लोकवस्तीच्या या शहरात त्या काळातील लखुजीराजाचा
राजवाडा, रंगमहाल, सावकारवाडा, काळाकोट, लखुजी राजांची समाधी, पुतळा बारव, सजना बारव, गंगासागर, बाळसमुद्र
या नावाच्या विहिरी, चांदणीतलाव, मोतीतलाव या ऐतिहासिक वास्तू बघण्याजोग्या आहेत. त्यापैकी मोती तलावाच्या
बाजूच्या पठारावर जिजाऊसृष्टीची जागा निवडण्यात आली आहे. या पठार शिवारात राजमाता जिजाऊ घोडय़ावरून फेरफटका
मारायच्या. याच ठिकाणी त्या युद्धकलेचे, राजकारणाचे शिक्षण घेत होत्या. त्याच तीर्थावर आज साकारणार आहे
'जिजाऊसृष्टी'.
हा 'जिजाऊसृष्टी' प्रकल्प देशाच्या स्वभिमानाचा राष्टीय प्रकल्प व्हावा व हे जगभरातील पर्यटकांचा आकर्षणाचे
केंद्र व्हावे असा सर्वोच्च विचार ह्या मागे आहे. त्यानुसार 'जिजाऊसृष्टी' हा विविध विषयांना समावून घेणारा
एकत्रित स्वरुपाचा प्रकल्प व्हावा तसेच ते अद्यावत तीर्थक्षेत्र व ज्ञानक्षेत्र व्हावे, ही संकल्पना आहे.
जिजाऊ संग्रहालय, जिजाऊ ग्रंथालय, महिला रोजगार केंद्र, महिला मिलीटरी अकॅड्मी, सिंधु संशोधन संस्था, महिला
विद्यापीठ अशा संस्थाची निर्मिती व्हावी, अशी योजना आहे. या शिवाय भारत देशाचा सुमारे 10,000 वर्षाचा सत्य
सांस्कृतिक इतिहास, जिजाऊ काळातील देशातील सर्व क्षेत्रातील स्थिती, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जिवनावरील
महत्वाचे प्रसंग ते आज पर्यंतची देशाची वाटचाल, बहुजन समाजातील सर्व समाज सुधारक, संतांची शिकवण
चित्ररुपाने, शिल्परुपाने, इलेक्ट्रॉनिक मध्यमांच्या साहाय्याने लिखीत स्वरुपात विविध प्रकारे चित्रित
केल्या जातील.
15 हजार स्क्वे. फुटाच्या सभागृहासह जवळपास 10 हजार स्क्वे. फुट (RCC) 3 मजली बांधकाम पूर्ण झाले आहे. 25
हजार स्क्वे. फुटाचा सुंदर बगीचा तयार करण्यात आला आहे. भव्य महाद्वाराची निर्मिती राजस्थानच्या
कारागिराकडुन केलेली आहे.
मात्र निधी अभावी कामाची गती पाहिजे तशी जलद नाही. मराठा सेवा संघ आणि समविचारी परिवर्तनवादी बहुजन
संघटनांनी बहुजनाच्या भावी पिढ्यांसाठी अक्षय उर्जास्त्रोत असणा-या जिजाऊसृष्टीच्या उभारणीसाठी दमदार पाऊल
टाकले असले तरी आपल्या स्वप्नातील मातृतिर्थाला समस्त बहुजन बांधवांच्या सहकार्याची नितांत गरज आहे. देणगी
विभागात या, जिजाऊ सेवा द्या, पावती घ्या. बरीच मंडळी आईवडिलांचा स्मृतीप्रित्यर्थ दान धर्म करतात, त्यांनी
ते जिजाऊ सेवेत द्यावे ही विनंती आहे.
आपणास आवाहन करण्यात येते की, आपापल्या जिल्ह्यातील दानशूर मंडळीची भेट घेऊन त्यांना या प्रकल्पाची माहिती
द्या, व यथाशक्ति मदतीची विनंती करा. सृष्टीविस्तारासाठी आवश्यक जमीन खरेदीकरीता एकरी रु. 10 लक्ष दराने
जास्तीत जास्त जिजाऊ प्रेमी तयार करावे ही आग्रही विनंती.
ऑनलाइन डोनेशन्स स्वीकारल्या जातत. "डोनेट नाउ" ची बटन दाबा आणि डेबिट / क्रेडिट कार्ड ने पैसे भरा.
प्रकल्पास मदत करणा-या व्यक्तींची नावे प्रकल्पाच्या प्रवेशद्वाराजवळ मोक्याच्या ठिकाणी नोंदविण्यात येईल व
वेबसाइट वर सुद्धा नमुद केले जाइल. ( देणगी करिता 80 जी नुसार इन्कमटॅक्स मध्ये सूट आहे. )