13 जानेवारी 2015 - लोकमत

गडकिल्ल्यांसोबत जिजाऊसृष्टीचाही विकास

छत्रपती शिवरायांनी स्वराज्य निर्माण करून आदर्श राज्य पद्धतीचे उदाहरण घालून दिले. त्यांच्या आदर्शाचे प्रतीक असलेले गडकिल्ले हे सुरक्षित असावेत, त्यांचे संवर्धन व्हावे, म्हणून लवकरच पुरातत्व विभागासोबत बैठक घेऊन निश्‍चित असे धोरण ठरवू; तसेच जिजाऊसृष्टीच्या विकासासाठी तयार करण्यात आलेला आराखडा पूर्ण केला जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी सिंदखेड राजा येथे जिजाऊ जन्मोत्सव सोहळय़ामध्ये दिली. जिजाऊसृष्टीवर जिजाऊ जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरूषोत्तम खेडेकर होते. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, महसूलमंत्री एकनाथ खडसे, गृहराज्यमंत्री डॉ.रणजित पाटील. ■ जिजाऊसृष्टीच्या विकासासाठी तयार करण्यात आलेल्या २५0 कोटीच्या आराखड्यातील १ कोटी रुपयांचा निधी तत्काळ उपलब्ध करून देत असल्याची घोषणा पालकमंत्री एकनाथ खडसे यांनी केली. ■ सिंदखेडराजा : मराठा सेवा संघाची (एमएसएस) भूमिका नेहमीच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) विरोधात राहिली आहे. त्यामुळे शिवधर्मपिठावर आरएसएसच्या तालमीत तयार झालेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीतीने अनेकांच्या भुवया उंचावल्या असतानाच, आरएसएस व एमएसएस कधीही एकत्र येणार नाहीत, असे स्पष्टप्रतिपादन मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरूषोत्तम खेडेकर यांनी सोमवारी शिवधर्मपिठावर केले. ■ छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे दैवत आहे. त्यांना घडविणार्‍या मातेचे जन्मस्थान विकसित व्हावे, येणार्‍या पिढीला हा इतिहास समजावा, यासाठी येथे उभारण्यात येणार्‍या जिजाऊसृष्टीकरिता केंद्राकडूनही निश्‍चित मदत दिली जाईल, अशी ग्वाही केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. राजमाता जिजाऊ या आदर्श माता, आदर्श कन्या व आदर्श राज्यकर्त्या होत्या. त्यामुळेच त्यांनी जाणता राजा घडविला. त्यांचा आदर्श ठेवून आम्ही कार्य करत राहू, असे ते म्हणाले. सोमवारी जिजाऊसृष्टीवर जिजाऊ जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात विचार व्यक्त करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,मंचावर डावीकडून स्वामी योगानंद महाराज, आमदार शशिकांत खेडेकर,भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, महसूलमंत्री एकनाथ खडसे, मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरूषोत्तम खेडेकर, युवराज संभाजीराजे भोसले आदी.


13 जानेवारी 2015 - दिव्य मराठी

मराठा आरक्षणासाठीचा लढा अद्यापही सुरूच - मुख्यमंत्री फडणवीस

सिंदखेडराजा - मराठा आरक्षणास न्यायालयाने स्थगिती दिल्याच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लागेपर्यंत राज्यातील १६ टक्के जागा मराठा समाजासाठी एका अध्यादेशाद्वारे आरक्षित ठेवल्या आहेत. तसेच मराठा आरक्षणासाठी अापण सर्वतोपरी प्रयत्न करत असून, सर्वोच्च न्यायालयात ते टिकावे यासाठी राज्य शासनामार्फत चांगल्या वकिलांच्या माध्यमातून लढा देत आहोत. मराठा आरक्षण झालेच पाहिजे, ही आपली भूमिका असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. राजमाता जिजाऊ यांच्या ४१७ व्या जन्मोत्सवानिमित्त सिंदखेडराजा येथील जिजाऊसृष्टीवर मराठा सेवा संघाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष अॅड. पुरुषोत्तम खेडेकर, तर प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, महसूलमंत्री एकनाथ खडसे, युवराज छत्रपती संभाजीराजे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, खा. सुप्रिया सुळे आदी मान्यवर उपस्थित होते. या वेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, सिंदखेडराजाच्या सर्वांगीण विकास आणि राज्यातील गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे. सिंदखेडराजा तसेच जिजाऊसृष्टीच्या सर्वांगीण विकासासाठी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांना प्राधिकृत समन्वयक करून त्यांच्या पुढाकारातून प्रयत्न केले जातील. सिंदखेडराजा विकास आराखड्यासंदर्भातील सर्वाधिकार महसूलमंत्र्यांना प्रदान करण्यात आल्याचेही मुख्यमंत्र्यांनी या वेळी स्पष्ट केले. राजमाता जिजाऊंचे जन्मस्थान असलेला राजवाडा हा देशासाठी प्रेरणास्थान आहे. त्यांचे स्मारक त्यांच्या जन्मभूमीत उभे व्हावे, ही आपली भूमिका आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची राजकीय, सामाजिक, आर्थिक, शेतीविषयक धोरणे राज्य सरकार राबवत आहे. छत्रपतींचा आशीर्वाद आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला अनुसरूनच सरकार काम करत असल्याचेही मुख्यमंतत्र्यांनी या वेळी सांगितले. जिजाऊंच्या जन्मभूमीच्या विकासासाठी प्रयत्न : गडकरी राजमाता जिजाऊंच्या जन्मभूमीच्या विकासासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून सर्वतोपरी प्रयत्न आपण करू, असे आश्वासन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिले. आदर्श माता, कन्या, मुलगी असे अनेक गुण त्यांच्यामध्ये होते. आपले दैवत छत्रपती शिवाजी महाराज असून त्यांचे नाव घेऊन कार्याची सुरुवात करत असल्याचे ते या वेळी म्हणाले. सिंदखेडच्या विकासासाठी १ कोटी सिंदखेडराजा विकास आराखडा, जिजाऊसृष्टी, स्मारकासंदर्भात २५० कोटी रुपयांचा विकास आराखडा मंजूर करण्यात आला आहे. त्याचा डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करण्यासाठी एक कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून १५ दिवसांमध्ये यासंदर्भातील प्रक्रिया पूर्ण होईल, असे महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी सांगितले. डीपीडीसीमधून ही तरतूद करण्यात येणार आहे. त्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना सूचनाही दिल्या. केंद्र सरकारच्या माध्यमातून सिंदखेडराजा शहर सर्किट टुरिझमचे केंद्र बनवण्याचा आपला मानस आहे. मराठा आरक्षण व्हावे यासाठी शासन प्रयत्नशील असून मुख्यमंत्र्यांनी त्या विषयीची भावना बोलून दाखवली असल्याचे ते म्हणाले. किल्ले देखभालीची संपूर्ण जबाबदारी राज्य सरकारची - युवराज छत्रपती भोसले महाराष्ट्राचा इतिहास हा राज्यातील गडकिल्ल्यांमध्ये लपलेला आहे. मात्र, या किल्ल्यांच्या देखभालीकडे राज्य सरकारचे दुर्लक्ष आहे. त्यामुळे राज्य सरकारने या किल्ल्यांच्या देखभालीसाठी पुढाकार घ्यावा, ही सरकारची जबाबदारी आहे, असे प्रतिपादन युवराज छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी आपल्या भाषणात केले. सुरुवातीला किमान राजगड, रायगड, पुरंदर, सिंधुदुर्ग, पन्हाळा या गडांचे संवर्धन झाले, तर राज्यातील जनतेसाठी ही अत्यंत महत्त्वपूर्ण बाब ठरेल, असेही युवराज भोसले यांनी या वेळी सांगितले.13 जानेवारी 2015 - सकाळ

जिजाऊ जन्मस्थान विकासाच्या आवश्यक देणगी13 जानेवारी 2015 - Deshonnati

सिंदखेड राजा येथे जिजाउजन्मौतसव सजरा झाला.13 जानेवारी 2015 - महाराष्ट्र टाइम्स

सिंदखेड राजा येथे जिजाउजन्मौतसव सजरा झाला.
13 जानेवारी 2015 - PunyaNagari

सिंदखेड राजा येथे जिजाउजन्मौतसव सजरा झाला